देशभरातील डमी शाळांवर सीबीएसईने त्वरित कारवाई करावी; शिक्षण मंत्रालयाकडून कडक सूचना

-केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई शाळांना देशभरातील डमी शाळांवर कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळांमधून काढून डमी शाळेत पाठवत असल्याच्या तक्रारी शिक्षण मंत्रालयाकडे आल्या आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 10:36 am
देशभरातील डमी शाळांवर सीबीएसईने त्वरित कारवाई करावी; शिक्षण मंत्रालयाकडून कडक सूचना

नवी दिल्ली : देशभरात पैशाच्या लोभापोटी शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या अनेक कोचिंग सेंटर व बोगस शिक्षण संस्थांचा वाढता सुळसुळाट लक्षात घेता केंद्र आणि शिक्षण मंत्रालय अलर्ट मोड वर आले आहे. देशातील डमी शाळांची मक्तेदारी संपवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रालयाने सीबीएसईला डमी शाळा ओळखून कारवाईचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. पालक आपल्या मुलांना उत्तम शाळांमधून काढून डमी शाळेत घालत असल्याच्या तक्रारी व प्रकरणे समोर येत असल्याचे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. CBSE plans to crack down on dummy schools - EducationTimes.com

 शिक्षण मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, काही नवीन तरतुदींची अंमलबजावणी झाली की विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी-वैद्यकीय आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग सेंटरवर अवलंबून राहावे लागणार नाही. अलीकडेच सीबीएसईने देशभरातील सुमारे २० शाळांची मान्यता रद्द केली आहे. ३ शाळांचा दर्जा खालावला आहे. या २० शाळांमध्ये राजस्थान, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश, यूपी, केरळ, उत्तराखंड आणि दिल्ली येथील शाळांचाही समावेश आहे. सीबीएसईच्या तपासणीत काही शाळांमधील डमी विद्यार्थ्यांचा डेटा सापडला आहे. 

Schools: Inspect All Schools, End Dummy Trend: Parents Assn To Govt |  Bhopal News - Times of India

काय आहेत डमी स्कूल ? 

नियमित शाळांमध्ये दररोज वर्ग घेतले जातात, डमी शाळांमध्ये वर्ग घेतले जात नाहीत. नियमित शाळेत, परीक्षेसाठी किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक असते, डमी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची अजिबात गरज नसते. नियमित शाळांमध्ये मुलांची योग्य नोंद ठेवली जाते, परंतु डमी शाळांमध्ये साधारणपणे मुलांची नोंद नसते. नियमित शाळांमध्ये, विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात तीन वेळा परीक्षा द्यावी लागते, परंतु डमी शाळांमध्ये, विद्यार्थी प्रात्यक्षिक आणि मुख्य परीक्षा देण्यासाठी वर्षातून एकदाच शाळेत जातात. दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीएसईला नोटीस बजावून डमी शाळांबाबत उत्तर मागितले आहेProbe, identify dummy schools: GSHSEB directs education officers after  complaint | Ahmedabad News - The Indian Express

बारावीनंतर इंजिनीअरिंग असो, वैद्यकीय प्रवेश परीक्षा असो किंवा विद्यापीठ प्रवेशासाठी सीयूईटी परीक्षा असो, ते सर्व एनसीईआरटी अभ्यासक्रमाचे पालन करतात. हा अभ्यासक्रम शाळांमध्ये चांगला शिकवला जातो तर कोचिंग सेंटरमध्ये तो शाळांप्रमाणे शिकवला जात नाही. मुलाला कोचिंग द्यायचे असेल तर नक्कीच द्यावे  पण शाळेच्या खर्चाने ते करता येत नाही, असं तो म्हणतो. Dummy schools draining CBSE affiliates of students | Ahmedabad News - Times  of India

डमी शाळा आणि डमी विद्यार्थ्यांची समस्या दिसते त्यापेक्षा कैकपटीने जास्त आहे. सीबीएसईने आतापर्यंत केवळ २० शाळांवर कारवाई केली आहे, मात्र वाढत्या डमी शाळांची मक्तेदारी संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाईची गरज आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत कोचिंग क्लास लावता येणार नाहीत, अशीही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईला मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आगामी काळात सीबीएसईकडून आणखी तपासणी होणार आहे. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित होईल. नियमित उपस्थितीचे निरीक्षण केल्यास डमी शाळांची मक्तेदारीही संपुष्टात येईल.The Oasis Effect Of Dummy Schools: Exploiting Expectations And  Misconceptions

हेही वाचा