भाच्याचा खून करणाऱ्या मामाला ७ दिवसांची कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st May, 12:21 am
भाच्याचा खून करणाऱ्या मामाला ७ दिवसांची कोठडी

फोंडा : सांताक्रुज-फोंडा येथे कृष्णा नाईक यांनी दारूच्या नशेत आपला भाचा अविनाश नाईक याचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी संशयिताला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. अटक केलेल्या संशयिताला ७ दिवसांचा रिमांड न्यायमूर्तींनी दिला आहे.
अविनाश नाईक यांनी आपले मामा कृष्णा नाईक यांना रविवारी संध्याकाळी पर्यंत घराची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती केली नसल्याने रविवारी रात्री कृष्णा नाईक व अविनाश नाईक यांच्यात कडक्याचे भांडण सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर कृष्णा नाईक यांचा राग अनावर झाला. त्यांनी अविनाश नाईक यांच्या डोक्यावर दगड व अन्य साहित्याने हल्ला चढवून त्याचा खून केला. सोमवारी दुपारी खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संशयिताला सोमवारी रात्री अटक केली. मंगळवारी संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांचा रिमांड ठोठावण्यात आला आहे. निरीक्षक तुषार लोटलीकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा