‘नीट’ ५ मे रोजी एनआयटीच्या कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये

परीक्षार्थींनी फोंड्याला न जाण्याचे आवाहन


30th April, 11:56 pm
‘नीट’ ५ मे रोजी एनआयटीच्या कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यावर्षीची ‘नीट’ ५ मे रोजी एनआयटी गोवाच्या कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये होणार आहे. त्यामुळे गोव्यातील परीक्षार्थींनी फोंडा कॅम्पसमध्ये न जाता कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन एनआयटीने केले आहे.
एनआयटी गोवाचे फोंड्यातून कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे यावर्षीची ‘नीट’ फोंड्यात होणार की कुंकळ्ळीत याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम पसरलेला आहे. गोवा एनआयटीचे फोंड्यातून कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये स्थलांतर झाल्याची माहिती आम्ही ‘नीट’ आयोजकांना दिलेली होती. परंतु, त्यांच्याकडून हॉल तिकिटावर कोणता पत्ता दिला आहे, याची माहिती आपल्याला नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी संभ्रमात न पडता परीक्षेसाठी कुंकळ्ळी येथील एनआयटी कॅम्पसमध्ये यावे. परीक्षार्थींनी फोंडा कॅम्पसमध्ये जाऊ नये, यासाठीचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असे एनआयटी गोवाचे संचालक ओ. आर. जैस्वाल यांनी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी एनआयटी फोंडा येथे सुरू होती. सरकारने एनआयटीसाठी कुंकळ्ळीत जागा दिली होती. त्यानंतर तेथे एनआयटीसाठी इमारत उभारून एनआयटीचे फोंड्यातून कुंकळ्ळी येथे स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत सर्व कारभार कुंकळ्ळी येथील कॅम्पसमधूनच सुरू आहे.                   

हेही वाचा