अंतराळात सापडले सर्वात मोठे कृष्णविवर; यात मावतील असंख्य ग्रह आणि तब्बल ३३ सूर्य

अंतराळातील शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे कृष्णविवर शोधून काढले आहे, यात थोडे थोडके नव्हे तर तब्बल ३३ सूर्य मावू शकतात. जाणून घ्या त्याबद्दलची रंजक माहिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 11:48 am
अंतराळात सापडले सर्वात मोठे कृष्णविवर; यात मावतील असंख्य ग्रह आणि तब्बल ३३ सूर्य

मुंबई : मंगळवार प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेत सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर  सापडले आहे, ज्याचे वस्तुमान सूर्याच्या ३३ पट आहे. त्याला Gaia BH3 असे नाव देण्यात आले आहे. त्या नावाचे कृष्णविवर युरोपियन स्पेस एजन्सीच्या गाया मिशनद्वारे गोळा केलेल्या डेटावरून अपघातानेच शोधले गेले आहे.Heart of Milky Way may host thousands of black holes: study | Technology  News - The Indian Express

ऑब्झर्व्हटोअर डी पॅरिस येथील नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (CNRS) चे खगोलशास्त्रज्ञ पास्क्वाले पानुझो यांनी मध्यमांना सांगितले.  Gaia BH3, हे आपल्या आकाशगंगेतील सर्वात मोठे कृष्णविवर असून, ते एक्विला नक्षत्रात स्थित आहे. याचे अंतर पृथ्वीपासून २००० प्रकाशवर्षे आहे.  The Galactic orbit of Gaia BH3 (voice - music)

मिळालेल्या माहितीनुसार Gaia BH3चे निरीक्षण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुर्बिणीने अचूक नोंदी मिळवल्या आणि याच द्वारे या कृष्णविवराचे एकंदरीत मूल्यमापन करण्यात यश मिळाले. त्याची भौगोलिक कक्षा, त्याचे विस्तार कक्ष, त्यांची घनता-वस्तुमान, त्याचे गुरुत्वाकर्षण आणि इतर भौतिक हेवेदावे स्पष्ट करण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. Scientists discover a huge black hole in our galaxy

याच द्वारे त्यांनी या कृष्णविवराचे वस्तुमान काढण्याचा प्रयत्न केला असता, गणिताचे अनेक क्लिष्ट प्रमेय, इक्वेशन्स यांचा आधार घेऊन यात अनेक ग्रह-तारे तसेच तब्बल ३३ सूर्य मावतील असा हिशेब मांडला.   Extraordinary black hole discovered in galactic neighborhood: Zentrum für  Astronomie

 दुर्बिणीमार्फत समोर आलेल्या पुढील निरीक्षणांनी पुष्टी केली आकाशगंगेत अस्तित्वात असलेले सर्वात मोठे कृष्णविवर आहे.  "आतापर्यंत  उच्च वस्तुमान असलेले ब्लॅक होल सापडेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण हा असा शोध आहे जो योगायोगाने लागला, आणि माझ्या आयुष्यात पुन्हा असा संयोग घडेल अशी अपेक्षा नाही" असे पानुझो यांनी म्हटले आहे.Gaia mission detects the most massive black hole of stellar origin in the  Milky Way - Current events - University of Barcelona

दुर्बिणीतून यंत्रालाचे निरीक्षण करत असतांना शास्त्रज्ञांचे लक्ष एका मृत ताऱ्यानजीकच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या एका छोट्या ताऱ्यावर पडले. याची गती आसामान्य अशी होती. यावरूनच एकंदरीत गती-वस्तुमान-घनतेचा हिशेब मांडला गेला. मिळालेल्या एकंदरीत उत्तराच्या आधारे पुन्हा निरीक्षण केले असता  त्यांना सूर्यापेक्षा ७५ टक्के कमी वस्तुमानाचा एक तेजस्वी तारा अदृश्य मार्गावर भ्रमण करताना दिसला. पुन्हा त्या मार्गाचा हिशेब मांडल्यावर शास्त्रज्ञांना भल्या मोठ्या कृष्णविवराचा शोध लागला.  Discovering the Monstrous Black Hole Gaia BH3 in the Milky Way

जेव्हा एखाद्या ताऱ्याचे आयुष्यमान संपू लागते तेव्हा तो तारा आतून नष्ट होण्यास सुरू होतो. फिशन आणि फ्यूशन प्रक्रियेमुळे प्रचंड गुरुत्वीय लहरी तयार होतात. कालांतराने एक प्रकारचे व्हेक्यूम तयार झाल्यानेआजूबाजूला जे काही असेल ते यात समावले जाते. यापूर्वीदेखील असे अनेक कृष्णविवर दृष्टीस पडले आहेत, पण या आकाराचा आणि इतका मोठा कृष्णविवर आकाशगंगेत पहिल्यांदाच सापडला आहे. Astronomers find biggest stellar black hole in Milky Way galaxy 'by chance'  - Times of India

मुख्य म्हणजे Gaia BH3 हे "निष्क्रिय" कृष्णविवर आहे त्यामुळे इतर अॅक्टिव कृष्णविवरासारखे यातून विलक्षण क्ष-किरण उत्सर्जित होत नाहीत किंवा म्हणावा तितका प्रकाशही दिसत नाही. यामुळे सहसा असे सुप्त कृष्णविवर शोधणे शक्य नाही. शास्त्रज्ञांनी दुर्बिणीने आकाशगंगेतील पहिले दोन सुप्त कृष्णविवर (Gaia BH1 आणि Gaia BH2)सध्या शोधून काढलेत. Gaia पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर स्थित आहे. Gaia could detect free-floating black holes passing near stars in the Milky  Way