कोविड लस बनवणाऱ्या एस्ट्राजेनेकाने यूकेच्या उच्च न्यायालयात मान्य केले 'लसीचे साइडइफेक्ट'

कोविडच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आता काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये साइड इफेक्ट उद्भवू शकतात असे कंपनीने म्हटले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th April, 10:12 am
कोविड लस बनवणाऱ्या एस्ट्राजेनेकाने यूकेच्या उच्च न्यायालयात मान्य केले 'लसीचे साइडइफेक्ट'

लंडन : कोविडमुळे जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या प्रभावित झाली. यावर उपाय योजना म्हणून विविध फार्मा कंपन्या पुढे सरसावल्या. यात  Pfizer - BioNTech , Oxford - AstraZeneca , Sinopharm BIBP , Moderna , Janssen , CoronaVac , Covaxin , Convivaxia , Convivax ,sanofi-GSK, Sputnik V , Sinopharm WIBP , abdalaa , Zifivax , Corbevax व  COVIran Barekat यांसारख्या वॅक्सिनमुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले. दरम्यान, गेल्या ४-५ वर्षांत या वॅक्सिन्सच्या साइड इफेक्टमुळे अनेक जण दगावल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. Does It Matter Which COVID-19 Vaccine You Get? | FiveThirtyEight

ब्रिटनमधील अग्रणी वॅक्सिन निर्माती कंपनी  एस्ट्राजेनेका (Oxford - AstraZeneca)यावरूनच गोत्यात सापडली आहे. या वॅक्सिनच्या साइडइफेक्टमुळे ब्रिटनमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. कंपनीविरुद्ध यूके उच्च न्यायालयात तब्बल ५१  खटले दाखल आहेत. पीडित कुटुंबीय कंपनीकडून सुमारे १००० कोटी रुपये (१०० दशलक्ष पौंड) नुकसान भरपाईची मागणी करत आहे.AstraZeneca files for US approval of drug to prevent COVID-19 - Express  Pharma

एका खटल्यादरम्यान ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राजेनेकाने प्रथमच न्यायालयात कबूल केले आहे की त्यांच्या कोविड-१९ लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. भारतात ही लस कोविशील्ड ( Covishield) म्हणून ओळखली जाते. एस्ट्राजेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. एस्ट्राजेनेकाची लस घेतल्यानंतर मृत्यू, रक्त गोठणे आणि इतर गंभीर समस्यांमुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहे. या लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याचा आरोप अनेक कुटुंबीयांनी केला.AstraZeneca Covid vaccine: safety and side effects - BHF

एका प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्राने न्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देत एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध पहिला खटला जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने दाखल केला होता. एप्रिल २०२१ मध्ये ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर त्यांच्या मेंदूला कायमची दुखापत झाली. लस घेतल्यानंतर जेमी परत काम करू शकला नाही. जेमीला टीटीएस (थ्रॉम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम) नावाचा गंभीर दुष्परिणाम झाला. त्यामुळे लोकांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. रिपोर्टनुसार, ॲस्ट्राजेनेकाने या वर्षी फेब्रुवारीमध्येच कोर्टात कागदपत्रे सादर केली होती. यामध्ये, कोविड लसीमुळे काही प्रकरणांमध्ये टीटीएस होऊ शकतो, असे सांगण्यात आले. JCM | Free Full-Text | Thrombocytopenia and Intracranial Venous Sinus  Thrombosis after “COVID-19 Vaccine AstraZeneca” Exposure

मे २०२३ मध्ये, ॲस्ट्राझेनेकाने म्हटले होते की ते टीटीएस (थ्रॉम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम) पूर्णतः लसीमुळे होत नाही. मात्र, कोविडच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आता काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये असे होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. एकंदरीत प्रकरणावर कंपनीने चिंता व्यक्त केली आहे. भारतात, ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने तयार केली आहे. लस बाजारात येण्यापूर्वीच SII ने ॲस्ट्राझेनेका सोबत करार केला होता. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात, सुमारे 80 टक्के लसीचे डोस फक्त कोविशील्डचे आहेत.कोविशील्ड वैक्सीन बनाने वाली AstraZeneca ने ब्रिटिश कोर्ट में साइड इफेक्ट  पर क्या बातें स्वीकार की हैं? 7 points में समझें - AstraZeneca Corona COVID  Vaccine Covishield ... 


हेही वाचा