वाहनचालकाचा लागला डोळा, मालवाहू टेम्पो धडकला वीज खांबाला

महाखाजन धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
29th February, 12:13 am
वाहनचालकाचा लागला डोळा, मालवाहू टेम्पो धडकला वीज खांबाला

कोरगाव : कोलवाळ येथून पेडणेकडे जाणारा एक मालवाहू टेम्पो महाखाजन धारगळ येथे पोहोचताच राष्ट्रीय महामार्गावर विजेच्या खांबावर धडक देऊन सुमारे १०- १५ मीटर अंतर जाऊन पलटी झाला.

पेडणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो (जीए ०७ एफ ९१९०) कोलवाळ येथून धारगळमार्गे मांद्रे येथे माल घेऊन जात होता. कोलवाळचा पूल पार करून राष्ट्रीय महामार्गावरून महाखाजन येथे टेम्पो पोहोचला असता वाहन चालक काॅन्सासिओ डिकाॅस्ता यांचा डोळा लागला. त्याने राष्ट्रीय महामार्गच्या दुभाजकावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली.

हा टेम्पो कलंडून सुमारे १० - १५ मीटर घरंगळत गेला. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पेडणे पोलीस ठाण्यातील हवालदार साजो मळेवाडकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. तर वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोमी शेटकर यांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रसंगी धारगळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य भूषण नाईक उपस्थित होते. 

हेही वाचा