चाको (कच्च्या फणसाची भाजी)

Story: उदरभरण |
17th February, 10:15 pm
चाको (कच्च्या फणसाची भाजी)

आताशा बाजारात कच्चे फणस दिसू लागतात. गोव्यात या कच्च्या फणसाची भाजी आवर्जून केली जाते. या कच्च्या फणसाची भाजी अतिशय चविष्ट लागते. फणस कच्चा असल्याने त्यातील आठळ्याही कच्च्या असतात. त्यामुळे भाजी खाताना या आठळया मध्ये मध्ये दाताखाली येतात आणि त्यामुळे ही भाजी खाताना मजा येते. या भाजीत खास शंकर छाप हिंगाची फोडणी दिल्याने भाजीची चव अप्रतिम लागते. चला, तर मग करुया आज चाको!

साहित्य 

एक कच्चा फणस, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, शंकर छाप हिंग एक लहान तुकडा, २ चमचे शिजवलेली तुरडाळ, ओल्या नारळाचा कीस एक वाटी, २ कांदे, राई, जिरे, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ व साखर.


कृती

प्रथम फणसाचे सालीसकट तुकडे करून घ्यावेत. मधला दांडा काढून टाकावा. एका पातेल्यात पाणी ठेवून त्याला उकळी आणावी. त्यात थोडे मीठ व तेल घालून त्यामध्ये फणसाचे तुकडे टाकावे. शिजल्यावर पाणी काढून टाकावे आणि थंड झाल्यावर साल काढून आतील गर काढून घ्यावा आणि तो सर्व हाताने कुसकरून घ्यावा. एका पातेल्यात फोडणीसाठी तेल ठेवून त्यात शंकर छाप हिंग, राई, जिरे, हिरव्या मिरच्या घालून चिरलेला कांदा घालावा, कांदा गुलाबीसर झाला की, त्यात शिजवून कुस्करून घेतलेला फणसाचा गर घालावा, थोडी हळद घालावी आणि चांगले ढवळून घ्यावे. मग चवीनुसार मीठ, साखर घालून वरतून खवलेले ओले खोबरे घालून झाकण ठेवावे व एक वाफ आल्यावर गॅस बंद करावा. तयार आहे चविष्ट चाको!


कविता आमोणकर