विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय पंतप्रधानांना : सदानंद शेट तानावडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December 2023, 04:47 pm
विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय पंतप्रधानांना : सदानंद शेट तानावडे

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवक म्हणून काम करत आहेत. पंतप्रधान २०१४ पासून ते अहोरात्र काम करत आहेत. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे श्रेय  फक्त त्यांनाच जात अाहे, असे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिल्लीत सांगितले.
राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. भाजपच्या विजयावर त्यांनी पत्रकारांना वरील प्रतिक्रिया दिली. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यापूर्वी तेलंगणात पक्षाचा एकच आमदार होता. यावेळी आठ आमदार निवडून आले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या पुढाकारामुळे कल्याणकारी योजना आणि विकास सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे देशात भाजपचीच लाट आहे.

हेही वाचा