सुदानमध्ये पुन्हा रक्तपात; संयुक्त राष्ट्रदेखील बनले हतबल!

‘यूनाइटेड नेशन्स इंटीग्रेटेड ट्रांजिशन असिस्टेंस मिशन’ थांबवले

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
03rd December 2023, 11:48 am
सुदानमध्ये पुन्हा रक्तपात; संयुक्त राष्ट्रदेखील बनले हतबल!

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ने शुक्रवारी सुदानमधील गृहयुद्ध समाप्त करण्यासाठी सुरू केलेली मोहीम थांबवण्यासाठी मतदान केले. या मतदानात रशियाने भाग घेतला नाही. सुदानमधील राजकीय मिशन संपवण्याच्या निर्णयावर यूएस आणि यूकेच्या राजदूतांनी निराशा व्यक्त केली परंतु सुदान सरकारची मिशन संपवण्याची इच्छा लक्षात घेता हे पाऊल आवश्यक असल्याचे सांगितले.

 'रॅपिड सपोर्ट फोर्स 'जंजवीद' बंडखोर संघटना एप्रिलच्या मध्यापासून सुदानी सैन्याविरुद्ध युद्ध करत आहेत. ही दहशतवादी संघटना सुदानची राजधानी खार्तूम आणि इतर शहरी भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारविरुद्ध युद्ध पुकारत आहे.Sudan's Rapid Support Force denies links to Wagner group – Military Africa

सरकार आणि 'रॅपिड सपोर्ट फोर्स  'जंजवीद' बंडखोर संघटनेदरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. लढाईमुळे, ६० लाखांहून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून सुदानमधील सुरक्षित ठिकाणी किंवा शेजारच्या देशांमध्ये आश्रयास जावे लागले. विविध मानवतावादी एजन्सींची उपस्थिती कायम ठेवत सुदानी लोकांच्या मदतीसाठी संघटना आपले प्रयत्न सुरू ठेवेल असे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.                          

हेही वाचा