दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

टी-२०साठी रोहित-विराटला विश्रांती; कसोटीत पुजारा-रहाणेला डच्चू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:10 am
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

दिल्ली : बीसीसीआय निवड समितीने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी टीम इंडियाचे ३ खेळाडू नेतृत्व करणार आहेत.
द. आफ्रिकेच्या या दौऱ्यात निवड समितीने सर्वच खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांना कसोटी मालिकेमधून डच्चू देण्यात आला आहे.
तर दुसऱ्या बाजूला निवड समितीने ३ युवा खेळाडूंची पहिल्यांदा भारतीय संघात निवड केली आहे. यामध्ये साई सुदर्शन, रिंकू सिंह आणि रजत पाटीदार या दोघांची निवड केली आहे. या दोघांना एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया एकूण ३ वनडे सामने खेळणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिंकू सिंहने याआधीच टीम इंडियाकडून टी-२० पदार्पण केले आहे. रिंकू सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला साई सुदर्शन आणि रजत पाटीदार या दोघांची ही पहिलीच वेळ आहे.
रजत आणि साईची आयपीएल कारकीर्द
रजत पाटीदारने आयपीएलमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. रजत पाटीदारने आयपीएलमधील १२ सामन्यांमध्ये १४४.२९ च्या स्ट्राईक रेटने ४०४ धावा केल्या आहेत. तर साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचा भाग आहे. साईने गुजरातकडून खेळताना १३ सामन्यांमध्ये ५०७ धावा केल्या आहेत.
.......
भारताचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला टी-२० : १० डिसेंबर (डरबन)
दुसरा टी-२० : १२ डिसेंबर (गकेबरहा)
तिसरा टी-२० : १४डिसेंबर (जोहान्सबर्ग)
......
पहिली एकदिवसीय : १७ डिसेंबर (जोहान्सबर्ग)
दुसरी एकदिवसीय : १९ डिसेंबर (गकेबरहा)
तिसरी एकदिवसीय : २१ डिसेंबर (पर्ल)
.........
पहिली कसोटी : २६-३० डिसेंबर (सेंच्युरियन)
दुसरी कसोटी : ३-७ जानेवारी (केपटाऊन)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ
कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
.......
टी-२० संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), सुंदर, रविदीप बिष्णोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
........
एकदिवसीय संघ : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार-यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजी चहल, मुकेश कुमार, अावेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.