ओटीटीवर हॉरर थ्रिलर, फॅमिली ड्रामाचा धडाका


24th November 2023, 12:12 am
ओटीटीवर हॉरर थ्रिलर, फॅमिली ड्रामाचा धडाका

तुम्ही ओटीटीवर नवीन चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षित उत्कृष्ट चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, नेटफिक्स, अॅमेझॉन ते हॉटस्टारपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका येत आहेत. या यादीमध्ये विजय थलापतीच्या लिओपासून अनेक हॉलिवूड प्रकल्पांचा समावेश आहे.

लियो

लोकेश कनकराजच्या निर्देशमध्ये लियो या चित्रपटाची मोठी क्रेज पहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलिज झाला आहे. ‘x’ वरही चित्रपइ ट्रेंड करीत आहे. चाहत्यांच्या पसंतीस हा सिनेमा उतरत आहे. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवरही पहाता येणार आहे.

द आम आदमी फैमिली

प्रेक्षक ‘झी ५’ वर या मालिकेचा आनंद घेऊ शकतात. जे एक फॅमिली ड्रामा आहे. जर तुम्हाला गुलक ते खिचडी सारखी अनेक कौटुंबिक नाटके आवडली असतील, तर या आठवड्यात तुम्ही ‘झी ५’वर २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा नक्कीच आनंद घेऊ शकता.

द विलेज

मिलिंद राऊ दिग्दर्शित ही एक तमिळ हॉरर थ्रिलर टेलिव्हिजन मालिका आहे. प्रेक्षक २४ नोव्हेंबरपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही मालिका पाहू शकतात.

अश्विन श्रीवतसंगम, विवेक रंगाचारी आणि शमिक दासगुप्ता यांच्या त्याच नावाच्या भयपट कादंबरीपासून प्रेरित ही कथा आहे, ज्यामध्ये भयानक तपशीलवार वर्णन केले आहे. मुळात ही कादंबरी याली ड्रीम वर्क्सने प्रकाशित केली होती. वेगवान भयपट मालिका प्रेक्षकांना तामिळनाडूच्या निर्जन प्रदेशातील कट्टियाल गावात घेऊन जाते, जिथे गौतम आणि त्याचे कुटुंब त्यांच्या जंगली स्वप्नात कल्पनेपेक्षा जास्त भयानक प्राणी भेटतात.

लास्ट कॉल फॉर इस्तंबूल

सरीन आणि मेहमेट यांच्या कथेवर आधारित ‘लास्ट कॉल फॉर इस्तंबूल’ २४ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

आई डोन्ट एसेप्ट एनीवन टू बिलीव मी

‘आई डोन्ट एसेप्ट एनीवन टू बिलीव मी’ नेटफ्लिक्सवर २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

माय डेमॉन

‘माय डेमॉन’ नेटफ्लिक्सवर २३ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. ज्या लोकांना अॅनिमल चित्रपट आणि मालिका पाहणे आवडते ते ‘माय डेमन’ बद्दल खूप उत्सुक असतील. ही मालिका बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती, जी आता २३ नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. ही मालिका एका मुलावर आधारित आहे, जो आपल्या आईला वाचवण्यासाठी राक्षसांच्या जगाशी लढतो आणि जपानच्या प्रवासाला निघतो.


ओपेनहाइमर

ओपेनहाइमर प्राइम वीडियो, एप्पल टीवी प्लेस, गूगल प्लेवर २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून या रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.


‘द व्हॅक्सिन वॉर’

विवेक अग्निहात्रीचा‘द व्हॅक्सिन वॉर’ ओटीटीवर टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट गेल्या महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. ‘द व्हॅक्सिन वॉर’ ही भारताने कोविड १९ साथीच्या काळात स्वत:ची लस बनविल्याची कथा आहे. लस तयार करण्यासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या वैज्ञानिक आणि डॉक्टरांचा संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

वर्जिन रिवर

जर तुम्हाला रोमँटिक चित्रपट आणि मालिका बघायला आवडत असेल तर वर्जिन रिवर ही रोमँटिक मालिका तुमच्यासाठी खूप चांगली असेल. या मालिकेच्या पाचव्या सीझनचा हा दुसरा भाग आहे. या मालिकेची कथा एका नर्सच्या जीवनावर आधारित आहे, जी एका नवीन सुरुवातीच्या शोधात कॅलिफोर्निया शहरात जाते. ही मालिका लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊ शकते.