आयआरबीच्या कॉन्स्टेबलची सावईवेरेत आत्महत्या! काही दिवसांपासून होता तणावाखाली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st November, 10:05 am
आयआरबीच्या कॉन्स्टेबलची सावईवेरेत आत्महत्या! काही दिवसांपासून होता तणावाखाली

पणजी : सावईवेरे येथील पोलीस खात्याच्या भारतीय राखीव दलातील (IRB) एका जवानाने सावईवेरे (फोंडा) येथे राहत्या घरात आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. योगेश्वर सावंत असे या जवानाचे नाव असून तो दलात रायबंदर येथील स्थानकात कॉन्स्टेबल पदावर सेवा बजावत होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे. तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. यातून त्याने जीवन संपवले. दरम्यान, म्हार्दोळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. त्याला नेमका कसला तणाव होता, हे अजून समोर आलेले नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत. 

दरम्यान, आरोग्य खात्याची कंत्राटी कर्मचारी असलेली अनुपमा गावकर (२४, वेळगे-सत्तरी) या तरुणीने १७ नोव्हेंबर रोजी आमोणा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तेही कारण अद्याप समार आलेले नाही. ही घटना ताजी असतानाच पोलीस कॉन्स्टेबलने जीवन संपल्याचे समोर आल्याने आत्महत्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा

चिंताजनक! गोव्यात दर महिन्याला सरासरी २६ जण करतात आत्महत्या!

हेही वाचा