डेंग्यूच्या भीतीने वाळपईत अनेक ठिकाणी ‘फॉगिंग’

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th September, 12:04 am
डेंग्यूच्या भीतीने वाळपईत अनेक ठिकाणी ‘फॉगिंग’

अशा प्रकारे सत्तरीच्या विविध भागांमध्ये फॉगिंग करण्यात येत आहे.

वाळपई : ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालय सतर्क झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी फॉगिंग व जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असून ताप आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.

वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात डेंग्यूबाधित दोन रुग्णांची नोंद असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र सदर रुग्ण हे कांदोळी भागात कामाला जात असतात. तेथे त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र स्थानिक पातळीवर अजूनपर्यंत एकही रुग्ण सापडलेला नाही.

दरम्यान, ज्या भागात डासांची पैदास वाढलेली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॉगिंग प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी पाण्याचा साठा होणार नाही याची विशेष काळजी नागरिकांनी घ्यावी, अशी विनंती करण्यात येत आहे. वाळपई सामाजिक रुग्णालयाचे कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्षपणे भेट देऊन या संदर्भातील माहिती नागरिकांना देत आहेत. सावंतवाडी, ता.२६: येथील राजवाडा परिसरात भले मोठे झाड कोसळले असून त्याखाली दोघे तरुण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी सावंतवाडी पालिकेचा बंब दाखल झाला आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ते तरुण नेमके कोण हे कळू शकले नाही. मदत कार्य सुरू आहे..