डिचोलीत शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th September, 11:53 pm
डिचोलीत शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग

डिचोली : येथील नवीन मार्केटमधील एका छोट्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून फ्रिज व इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दल तातडीने रवाना झाल्याने आग आटोक्यात आली.

डिचोली अग्नीशमन दलाच्या भरत गवस, गीतेश नाईक, रामचंद्र एकावडे, सागर कुक्कलकर, रुपेश पळ आदींनी तातडीने मदत करून पन्नास हजारांची मालमत्ता वाचवली.

विश्वास गावस यांच्या या छोट्या गाळ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने फ्रिज तसेच पॅनल बोर्ड जळाला. वेळीच स्विच बंद केल्याने व अग्निशमन दल जवान घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून सुमारे तीस हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, डिचोली मार्केटमधील विविध गाळे तसेच छोटी मोठी दुकाने त्यावर असलेली प्लास्टिक आच्छादने या बाबतीत खबरदारी घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा