तिखाजन मये येथे घरावर कोसळला वृक्ष

चार ते पाच लाखांचे नुकसान


27th May 2023, 12:52 am
तिखाजन मये येथे घरावर कोसळला वृक्ष

प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : तिखाजन मये येथील संदेश गजानन ठाणेकर  यांच्या घरावर पहाटे वृक्ष कोसळून  घराचे छप्पर,  भिंती आदींचे मिळून सुमारे चार ते पाच  लाख रुपयांचे नुकसान झाले. यावेळी  संदेश यांच्या कानाला किरकोळ दुखापत झाली. नव्याने बांधण्यात आलेले शौचालय  व  इतर बांधकामाचे मोठे नुकसान झाले. डिचोली  अग्निशमन  दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या सहकार्याने झाड  हटवले. स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घटनेची दखल  घेतली आहे.

हेही वाचा