रताळ्याची भरलेली कापं (चार जणांसाठी)

Story: उदरभरण | चंदन च्यारी |
20th May 2023, 11:03 Hrs
रताळ्याची भरलेली कापं (चार जणांसाठी)

साहित्य  रताळी (कणगी)   -  ४०० ग्रॅम, किसलेलं माडाचं गूळ - १ वाटी, मीठ - चवीप्रमाणे 

कृती : रताळी धुवून घेऊन ती मीठ टाकून उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांच्या गोल चकत्या करून घ्या. किसलेलं गूळ आणि खोबरं एकत्र करून ते एका चकतीवर पसरून घ्या आणि वर दुसरी चकती ठेवा. अशी ही कापं चहासोबत खायला द्या. 

(लेखक आखाती देशांमध्ये सुमारे १७ वर्षे शेफ म्हणून नोकरी करून परतलेले गोव्यातील प्रसिद्ध पिझ्झा मेकर आहेत.)