सात ग्रामपंचायतींच्या पोट​निवडणुकांचा निकाल जाहीर


28th March 2023, 12:51 am
सात ग्रामपंचायतींच्या पोट​निवडणुकांचा निकाल जाहीर

विजेत्या उमेदवाराचे अभिनंदन करताना आमदार एल्टन डिकाॅस्ता. सोबत इतर.


प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यात ७ पंचायतीतील काही प्रभागामध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात वेळगे ग्रामपंचायत प्रभाग क्र. ५, ग्रामपंचायत वनम्हावळींगे कुडचिरे प्रभाग क्र. ६, ओर्ली ग्रामपंचायत प्रभाग क्र. ६, काले पंचायत प्रभाग क्र. २, बार्शे पंचायत प्रभाग क्र. ७, राशोल ग्रामपंचायत प्रभाग क्र. १, बाळ्ळी ग्रामपंचायत प्रभाग क्र. ४ या प्रभागांचा समावेश होता. निवडणूक निकालानंतर अनेक पंचायत सदस्यांनी आनंद साजरा केला. तसेच विजेत्या सदस्यांचे आमदार, सरपंच तसेच इतर सदस्यांनी अभिनंदन केले.

वनम्हावळींगेतील प्रभाग इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षित होता. यात शाहू बोमो वरक हे विजयी झाले. त्यांना १९६ (५१.४४ टक्के) मते मिळाली. वेळगेतील प्रभाग क्र. ५ खुला गटात होता. यात सर्वेश नवसो घाडी यांचा विजय झाला. त्यांना १३८ मते (५५.४२ टक्के) मते मिळाली. ओर्ली ग्रामपंचायतीचा प्रभाग क्र. ६ खुला होता. यात पिटर फर्नाडिस यांचा विजय झाला. त्यांना ५४ मते (४७.३७ टक्के) मते मिळाली. राशोल ग्रामपंचायतीचा प्रभाग खुला होता. यामध्ये फातिमा कार्दोस यांनी विजय मिळविला. त्यांना ११० मते (५३.९२ टक्के) मते मिळाली. बाळ्ळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग ४ मधून हर्षद विठ्ठल पारित यांनी विजय मिळविला. त्यांना ११८ मते (३७.८२ टक्के) मते मिळाली.

बार्शे ग्रामपंचायतीचा प्रभाग ७ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. येथे सर्वानंद मोनो वेळीप यांचा विजय झाला. त्यांना २३० मते (५३.३६ टक्के) मिळाली. काले ग्रामपंचायतील प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी खुला होता. येथे सूरज काशिनाथ नाईक यांचा विजय झाला. त्यांना १४७ मते (५२.५० टक्के) टक्के मते मिळाली.