सतीश कौशिक यांची डिसेंबरमधील गोवा भेट अखेरची


09th March 2023, 11:07 pm
सतीश कौशिक यांची डिसेंबरमधील गोवा भेट अखेरची

दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्यासोबत डीबीएलचे अधिकारी, कर्मचारी.        

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी अभिनेते सतीश कौशिक आपल्या सहकाऱ्यांसह गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नवीन झुआरी पुलालाही भेट दिली होती.
दाबोळी विमानतळावरून उत्तर गोव्यातील किनारी भागात ते निघाले होते. त्याच दिवशी नवीन झुआरी पूल वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिकारी तसेच डीबीएल कंपनीचे अधिकारी काही वाहनचालकांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे स्वागत करत होते. या पुलावरून वाहनाने जाणारे पटकथा लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सतीश कौशिक यांचेही पुष्प देऊन पोलिसांकडून स्वागत करण्यात आले.
आपल्या वाहनातून उतरलेल्या कौशिक यांनी डीबीएलच्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले होते. तसेच गोवा पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल कौतुकही केले होते. सतीश कौशिक यांची ही गोवा भेट अखेरची ठरली.