कन्नड गाणे न गायल्याने कैलाश खेर यांच्यावर फेकली बाटली

|
31st January 2023, 12:08 Hrs
कन्नड गाणे न गायल्याने कैलाश खेर यांच्यावर फेकली बाटली

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

हम्पी : म्युझिक कॉन्सर्टमध्ये कन्नड गाणे न गायल्याने स्टेजवर असलेल्या गायक कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

२९ जानेवारी रोजी कैलाश खेर कर्नाटकात एका म्युझिक कॉन्सर्टसाठी आले होते. स्टेजवर परफॉर्मन्स देत असताना अचानक एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून हल्ला केला. कैलास खेर यांना घटनास्थळी उपस्थित जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. जमावात उपस्थित दोन लोकांनी त्याच्याकडे कन्नड गाण्याची मागणी करण्यास सुरुवात केली, पण कैलास खेर यांनी कन्नड गाणे न गायल्याने वातावरण तापले. याचा राग अनावर होऊन जमावात असलेल्या दोन व्यक्तींनी कैलास खेर यांच्यावर पाण्याची बाटलीच फेकली. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवून दोन जणांना अटक केली.

कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हम्पीतील या कार्यक्रमाची माहिती दिली होती. रविवारी कैलाश खेर यांनी ट्विट करून लिहिले की, भारतातील प्राचीन शहर, काळ खंड, मंदिर आणि पोटमाळा, हम्पीच्या रूपात समाविष्ट केले जात आहे. कैलास बँडचा शिवनाद आज हम्पी महोत्सवात गुंजणार आहे, असे लिहिले होते.