राजस्थानमधील गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या

गुन्हेगारांचा शोध सुरू; राज्यात कडक नाकाबंदी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd December 2022, 07:23 pm
राजस्थानमधील गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या

उदयपूर : राजस्थानचा कुख्यात गँगस्टर राजू ठेहटची शनिवारी सकाळी गँगवॉरमध्ये हत्या करण्यात आली. कोचिंगच्या ड्रेसमध्ये पोहोचलेल्या हल्लेखोरांनी ठेहटला घंटी वाजवून घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या. ठेहटला तीनहून जास्त गोळ्या लागल्या.
राजस्थानचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. एका गुन्हेगाराने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. या हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रोहित गोदाराने जबाबदारी घेतली आहे. गुन्हेगार पंजाब व हरियाणा सीमेच्या दिशेने पळून गेले आहेत. राजस्थान पोलीस त्यांच्या मागावर आहेत. संपूर्ण राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वच एसचओंना फील्डवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.
सिकर शहरातील पिपराली रोडवर ठेहटचे घर आहे. येथे झालेल्या गोळीबारात नागौरचा एक व्यक्तीही ठार झाला आहे. हा व्यक्ती गोळीबाराचा व्हिडिओ तयार करत होता. त्यामुळे आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. या भागात लावण्यात आलेल्या चारही सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारही हल्लेखोर दिसून येत आहेत. यात ते शस्त्रांसह पळून जाताना दिसून येत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज उजेडात

गोळीबाराची माहिती मिळताच सिकरचे पोलीस उपअधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांच्यासह उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन डीजीपींच्या निर्देशांनुसार, संपूर्ण राज्यात नाकेबंदी केली.
- संपूर्ण हत्याकांडाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहेत. एका फुटेजमध्ये ठेहटच्या घरापुढे ट्रॅक्टर येऊन थांबल्याचे व त्यातून ४-५ हल्लेखोर शस्त्र काढून ठेहटवर गोळीबार करत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगार ३०-४० सेकंदांपर्यंत ठेहटवर गोळीबार करतात.
- त्यांनी जवळपास ५० ते ६० फैरी झाडल्या. त्यानंतर तो मरण पावल्याची खातरजमा केली व पळून गेले. ठेहट गँग शेखावाटीत सक्रिय होती. तिचे आनंदपाल गँगशी हाडवैर होते. आनंदपालच्या एन्काउंटरनंतरही दोन्ही टोळ्यांत वर्चस्व युद्ध सुरू होते.

हेही वाचा