जागेवर खिळवून ठेवणारे ‘सायको थ्रिलर’ सिनेमा


17th November 2022, 09:20 pm
जागेवर खिळवून ठेवणारे ‘सायको थ्रिलर’ सिनेमा

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनाने लोकांच्या मनोरंजनाची साधने वाढली. येथे दररोज किंवा आठवड्यात अनेक नवीन चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होतात, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कधीही पाहू शकता. काहींना अ‍ॅक्शन आवडते, तर काहीजण रोमँटिक चित्रपटांचे शौकीन असतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही साऊथच्या काही सर्वोत्तम सायको थ्रिलर चित्रपटांची यादी तयार केली आहे, जे तुम्ही घरी बसून कधीही पाहू शकता.
'यू टर्न'
समंथा रुथ प्रभू आणि आधी पिनिसेट्टी स्टारर 'यू टर्न' हा द्विभाषिक पॅरानॉर्मल थ्रिलर चित्रपट आहे. पवन कुमार दिग्दर्शित या चित्रपटात फ्लायओव्हरवरील अपघाताची चौकशी क्राईम रिपोर्टर करत आहे. हा चित्रपट ‘एमक्स प्लेअर’वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे, जो तुम्ही विनामूल्य पाहू शकता.
‘रत्सासन’ 
राम कुमार दिग्दर्शित ‘रत्सासन’ २०१८ तमिळ सायको थ्रिलर चित्रपटाची ही हिंदी डब केलेली आवृत्ती आहे. चित्रपटाची कथा एका महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्याभोवती फिरते जो आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सीरियल किलरच्या शोधात जातो. हा चित्रपट तुम्ही यूट्युबवर मोफत पाहू शकता.
वाईफ ऑफ राम
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याची कथा एका महिलेभोवती फिरते जी आपल्या पतीच्या खुन्याच्या शोधात आहे. कथा जसजशी पुढे सरकते, वास्तव लोकांसमोर येते, तेव्हा सगळेचजण आश्चर्यचकीत होतात. हा चित्रपट एमएक्स प्लेअरवर उपलब्ध आहे.
गुल्टू
'गुल्टू' हा कन्नड सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, जो २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका मुलाची आहे आणि त्याला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे. पण तो सायबर क्राइमच्या गुन्ह्यात अडकतो, त्यानंतर कथा रंजक बनते. हा चित्रपट एमएक्स प्लेअरवर देखील उपलब्ध आहे.
बकासुर
हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका वकिलाभोवती फिरते जो पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याच्या या सवयीमुळे कथेला अनेक रंजक वळणे येतात आणि ती तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.