डिचोली बाफ क्लबचे उद्घाटन

माजी फुटबॉल कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर यांची उपस्थिती


03rd October 2022, 12:28 am

डिचोली बाफ क्लबच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना ब्रह्मानंद शंखवाळकर, संजीव नागवेकर, कुंदन फळारी, सचिन साळकर व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली :
गोवा फुटबॉलप्रेमी राज्य असून डिचोलीतील बाफ क्लबने गेल्या बावन्न वर्षात देशाला अनेक दर्जेदार फुटबाॅलपटू दिले. क्लबने तीच किमया यापुढेही चालू ठेवण्याचे आवाहन भारताचे माजी फुटबॉल कर्णधार पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी केले.
डिचोली फुटबॉल क्लब ऑफ बिचोलिम फॅन्स (बाफ) क्लबच्या नूतनीकृत कार्यालय व वर्धापनदिन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा क्लब सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय गोलरक्षक संजीव नागवेकर, अध्यक्ष नगराध्यक्ष कुंदन फळारी, सचिव सचिन साळकर, नरेश कडकडे, सदानंद नाटेकर, रजनीकांत लावणीस आदी उपस्थित होते.
यावेळी हर्श पत्रे, सिमरन नार्वेकर, कपिल होबळे, पंढरी चोपडेकर, लक्ष्मण राणे, अमय मोरजकर, हर्षद जल्मी आदी फुटबॉलपटूंचा सत्कार करण्यात आला. ‍संजीव नागवेकर यांनी डिचोलीत फुटबॉलला मोठी उपलब्धी असून नवे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी विशेष योगदान देण्याचे आवाहन केले.
कुंदन फळारी यांनी पुन्हा एकदा बाफ क्लब नव्या दमाने खेळाडू घडवण्यासाठी विशेष योगदान देण्यास सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी रजी लावणीस यांनी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन वैभव कळंगुटकर यांनी केले.

खेळाच्या माध्यमातून शिस्त व खिलाडीवृत्ती आत्मसात होत असते. फुटबॉल हा गोवेकरांचा आवडता खेळ असून युवा फुटबॉलपटूंना घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. राज्यात या खेळाला मोठे भवितव्य असून योग्य दिशेने वाटचाल केली, परिश्रम केले तर अनेक खेळाडू देशपातळीवर चमकू शकतात. _ ब्रह्मानंद शंखवाळकर, देशाचे माजी फुटबॉल कर्णधार