अष्टमी नवमीचा प्रसाद

Story: अन्नपूर्णा । स्वप्ना नाईक |
30th September 2022, 10:20 pm
अष्टमी नवमीचा प्रसाद

काळा चणा

साहित्य : १०० ग्रॅम काळा चणा, २ चमचे मिरची पावडर, १ टीस्पून जिरा पावडर, १ टीस्पून धने पावडर, १/२ टीस्पून हळद पावडर, १ चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, १ तमालपत्र, २ चमचे शुद्ध तूप.

कृती : चणे रात्रभर भिजत ठेवा. दुसर्‍या दिवशी प्रेशर कुकरमध्ये १०० मिली पाण्यात चणे आणि तमालपत्र सुमारे ५ शिट्या होईपर्यंत शिजवा. कढईत तूप गरम करून वरील सर्व पावडर मसाला घालून २ मिनिटे शिजवा, आता उकडलेले चणे आणि त्यात पाणी घालून ते सुकेपर्यंत शिजवा.

सूजी का हलवा (शिरा)

साहित्य : १/२ कप रवा, १/२ कप साखर, १/४ कप प्युरी तूप, ५ वेलच्या, दीड कप पाणी, १/४ कप चिरलेला बदाम.

कृती : कढईत तूप गरम करून बदाम तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. त्याच कढईत वेलची आणि रवा घालून हलका तपकिरी होईपर्यंत ५ मिनिटे परतून घ्या. पाणी घालून कोरडे होईपर्यंत शिजवा. साखर आणि भाजलेले बदाम टाकून झाकून ठेवा आणि २ मिनिटे शिजवा.

आपल्या सर्व पाहुण्यांना गरमागरम सर्व्ह करा, नवरात्री स्पेशल चन्ना हलवा पुरी.