फाळणी स्मृतिदिनी पणजीत मूक मोर्चा

|
14th August 2022, 11:41 Hrs
फाळणी स्मृतिदिनी पणजीत मूक मोर्चा

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : देशात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ म्हणजे फाळणी दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

फाळणी दिनानिमित्त संध्याकाळी पणजी चर्च ते आझाद मैदान येथे स्मृती दिनानिमित्त मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कुठलीच घोषणा न देता शांततापूर्ण हा मूक मोर्चा काढण्यात आला.

यादिवशी विभाजन झाल्याने या दिवसाला अधिक महत्त्व आहे. त्याची आठवण म्हणून स्मृती दिवस साजरा करण्यात आला.

पणजी बसस्थानकावर प्रदर्शन

पणजी बसस्थानक येथे स्मृती दिनानिमित्त प्रदर्शन भरविण्यात आले असून याचे उद्घाटन अभिलेखागार आणि पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी गृह सचिव मेनिनो डिसोझा, संजीव गडकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांचीही उपस्थिती होती. नागरिकांसाठी विशेष प्रदर्शन सरकारतर्फे पणजी आणि म्हापसा येथील बसस्थानकावर भरविण्यात आले आहे.