बस-स्कूटर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

|
25th June 2022, 12:42 Hrs
बस-स्कूटर अपघात;  दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासमोर शुक्रवारी दुपारी स्कूलबसची धडक दुचाकीला बसली व या अपघातात दुचाकीस्वार लवकुश शर्मा (वय २३) या युवकाला गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी बस चालकाला फातोर्डा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासमोर शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. मडगाववरुन पणजीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शाळेतील मुलांना घेऊन जाणाऱ्या बसची धडक दुचाकीला बसली. 

बसच्या धडकेने दुचाकीस्वार लवकुश शर्मा हा रस्त्यावर पडला. त्यावेळी बसचे मागील चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ इस्पितळात नेण्यात आले मात्र, डोक्यावरील गंभीर जखमांमुळे अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला.