सुपर स्पेशालिटीमध्ये पाच ओपीडी सुरू

गोमेकॉच्या जुन्या हॉस्पिटलवरील ताण होणार कमी

|
24th May 2022, 12:24 Hrs
सुपर स्पेशालिटीमध्ये पाच ओपीडी सुरू

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : बांबोळी येथील गोमेकॉच्या नवीन बांधण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच ओपीडी सुरू करण्यात अाल्या आहेत. यात युरोलॉजी, कार्डियॉस्कुलर आणि थोरॉसिक सर्जरी, नेफ्रोलॉजी, न्यूरॉसर्जरी आणि न्यूरॉलॉजी या ओपीडींचा समावेश आहे. त्यामुळे आता जुन्या हॉ​​स्पिटलवरील ताण काही प्रमाणात कमी हाेणार आहे.
युरोलॉजी ओपीडीत साेमवारी सकाळी ८ ते दुपारी १, बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२, शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १२ व सायं. २.३० ते ४ पर्यंत रुग्णांना तपासले जाणार आहे. कार्डियॉस्कुलर आणि थोरॉसिक सर्जरी ओपीडीत मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १, गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १, शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत तपासणी होणार आहे. नेफ्रोलॉजी ओपीडी सोमवारी सकाळी ८ ते दुपारी २, बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २, शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ तपासणी केली जाणार आहे. न्यूरोसर्जरी ओपीडी सोमवारी सकाळी ८ ते दुपारी १२, बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २, शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ आणि न्यूरोलॉजी ओपीडीत सोमवारी दुपारी २.३० ते सायं. ४, मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १, गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत तपासणी केली जाणार आहे.
बांबोळीत नवीन बांधण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आत्याधुनिक मशिनरींनी सज्ज आहे. त्यामुळे अाता अतिदुर्गम आजारांवरही या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. याचा फायदा गाेव्यातील तसेच गाेव्याबाहेरील रुग्णांना हाेणार आहे. आता टप्प्याटप्प्याने या हॉस्पिटलच्या अोपीडी खुल्या केल्या जात आहेत.