कमल हासनला अॅक्शन थ्रिलर ‘विक्रम’


19th May 2022, 11:29 pm
कमल हासनला अॅक्शन थ्रिलर ‘विक्रम’

कमल हासन दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा चित्रपटाच्या पडद्यावर परतला आहे. २०१८ मध्ये, तो ‘विश्वरूपम’ या चित्रपटात दिसला होता जो हिंदी तसेच तमिळमध्ये प्रदर्शित झाला होता. चाहते त्याच्या ‘विक्रम’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यामध्ये कमल हासनची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे.
विक्रमच्या ट्रेलरची सुरुवात जबरदस्त संवादांनी होत आहे. कमल हसनच्या अँग्री यंग मॅन लूकमध्ये प्रचंड सस्पेन्स पाहायला मिळत आहे. हातात शस्त्रे घेऊन तो चित्रपटात शत्रूंशी लढताना दिसणार आहे, हे ट्रेलरमध्ये दिसत आहे. निर्भयपणे आणि निडरपणे तो या चित्रपटात आपली अ‍ॅक्शन चोखपणे दाखवताना दिसणार आहे. कमल हासन ६७ वर्षांचा झाला आहे, परंतु आजही त्याचा अॅक्शन अवतार नवोदित अभिनेत्यांना लाजवताना दिसत आहे.
२ मिनिटे ३८ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कमल हासनने लाइमलाइट लुटली आहे. विक्रमचे दिग्दर्शन लोकेश कनगराजी करत आहेत. हा चित्रपट तमिळ व्यतिरिक्त हिंदीतही ३ जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कमल हासनशिवाय दक्षिणेतील दिग्गज अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे.