मालपे उतरणीवर अपघात; दोघे जण जखमी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2022, 12:37 am
मालपे उतरणीवर अपघात; दोघे जण जखमी

पेडणे : गुरुवार दि. ६ रोजी सकाळी दहा वाजता मालपे उतरणीवर अपघात होऊन दोन नागरिक जखमी झाले. पेडणे अग्निशमन दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केल्यामुळे दोन नागरिकांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. 

मालपे येथे अपघात घडल्याची माहिती अग्निशमनदलाला मिळताच अधिकारी प्रशांत धारगळकर व जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळ न घालवता जवानांनी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून दोघांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेमध्ये घालून तुये आरोग्य केंद्रात पाठवले. दोघांची प्रकृती स्थिर आहे. मारुती गाडीतील श्याम मसुरकर यांच्या पायाला व कमरेला दुखापत झाली असून, संदीप गोलप याच्या पायाला व डोक्याला दुखापत झाली आहे. 

मारुती गाडी जीए०३-एच-५१९०,रेवोडा ते सातरड्याला जात होती. मालपे उतरणीवर पाठीमागून, यूपी-१७-एटी- ७५१७, या टिप्परने मारुती गाडीला धडक दिली. पुढून येत असलेल्या एमएच-०२-एफजी-७७७१ हा नोंदणी क्रमांक असलेल्या टँकरवर मारुती गाडीची धडक बसली. टँकर मुंबईहून मोपा विमानतळाकडे डीजल घेऊन जात होता. अग्निशमन दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, यांच्या नेतृत्वाखाली, हवालदार जयराम शेटगावकर, चालक रामदास परब, जवान अमोल परब, मयूर नाईक आणि प्रज्योत होबळे यांना दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले.

हेही वाचा