राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोव्याचा संघ रवाना

|
19th October 2021, 10:02 Hrs
राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोव्याचा संघ रवाना

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पेडणे : दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोवा संघ मंगळवारी रवाना झाला. पेडणे मगो नेता प्रवीण आर्लेकर व इतर मान्यवरांनी यावेळी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.

इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली पहिली राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धा २०, २१ व २२ ऑक्टोबर असे तीन दिवस  होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध वजनी गटात सहभागी  होण्यासाठी गोव्याच्या २५ खेळांडूचे शिबिर घेऊन निवड करण्यात आली होती.

गोव्याच्या संघात वैयक्तिक पुरुष गटात विराज वीर, परबिंदरा राजवर, जयकांत बारीक, अमिश पात्रा, शहिद फरिद्दीन, दिप्तेश परब, साहील पेडणेकर, जोएल ग्रासियस, साईप्रसाद वेळीप, लक्ष्मण सावंत, किसन गावस व केलिन कुलासा व प्रशिक्षक सनी मोहिंदुरू (हरियाणा)

मुलींच्या विभागात शिल्पा वेळीप, दिया वेळीप, गौतमी जुवेकर व रुक्मा फाळे यांची निवड झाली. प्रशिक्षक म्हणून भावना चोडणकर तर व्यवस्थापक म्हणून साधना हरमलकर यांची निवड झाली. या संघासोबत गोवा ग्रेपलिंग संघटनेचे अध्यक्ष संदीप पेडणेकर, सरचिटणीस जयवंत बोभाटे, सचिव नारायण मराठे, कोषाध्यक्ष संजय म्हापसेकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष शिवराम तुकोजी, उत्तर गोवा सचिव किशोर किनळेकर, सदस्य गौतम राऊळ, प्रताप देसाई, सदानंद कडोली, तांत्रिक अधिकारी तसेच इतर पदाधिकारी मिळून ३५ जण रवाना झाले.