कळंगुट गँगवॉर : संशयितांना अतिरिक्त ८ दिवसांची कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th October 2021, 12:17 Hrs
कळंगुट गँगवॉर  : संशयितांना अतिरिक्त ८ दिवसांची कोठडी

म्हापसा ः कळंगुट येथे मार्केटजवळ दोन गटांत झालेल्या गँगवॉर प्रकरणातील चारही 

संशयित आरोपींना अतिरिक्त आठ दिवसांची पोलीस कोठडी प्रथमश्रेणी न्यायालयाने 

सुनावली आहे. शिवाय संशयितांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

मंगळवार दि. ५ रोजी तलवारी, सुरे आणि लोखंडी सळ्यांच्या साहाय्याने हे गँगवॉर घडले 

होते. यात फिर्यादी स्वप्निल रेडकर (तोर्डा पर्वरी) हा एका नाइट क्लबचा बाउन्सर 

कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी टारझन पार्सेकर (नागवा), सूर्यकांत ऊर्फ 

सूर्या कांबळी (शंकरवाडी ताळगांव), इम्रान बेपारी (उबो दांडो सांताक्रूज) व सूरज शेट्ये 

ऊर्फ बाबू (सांत कायतानवाडो मेरशी) या संशयितांना कळंगुट पोलिसांनी भा.दं.सं.च्या 

३२६ व हत्यार कायदा कमल ७ आणि २५ खाली गुन्हा नोंदवून अटक केली होती. चारही 

संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अतिरिक्त आठ 

दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, संशयितांनी जामिनासाठी 

न्यायालयात दोन वेळा अर्ज केला होता. पण, हे दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले 

आहेत.