श्रुंगी, झेविअर, झिदान, संजनाची चमकदार कामगिरी

|
12th October 2021, 12:01 Hrs
श्रुंगी, झेविअर, झिदान, संजनाची चमकदार कामगिरी

कर्नाटक स्टेट सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिरिअर अॅक्वेटीक चॅम्पियनशिप २०२०-२१मध्ये गोव्याच्या झेविअर डिसोझा, झिदान सय्यद, श्रुंगी बांदेकर व संजना प्रभुगावकर यांनी एकूण १५ पदके जिंकली. त्यांनी विविध विभागात सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजन कर्नाटक स्विमिंग असोसिएशनतर्फे करण्यात आले होते.
सध्या हे चारही जलतरणपटू बंगळुरू येथे ‘गाफ्रे’ अॅक्वेटीक सेंटर येथे पूर्ण वेळ प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी बॅकस्ट्रोक, फ्री स्टाईल, आयएम - वैयक्तिक मेडली गटात शानदार कामगिरी केली आहे.
झेवियर डिसोझाने १ रौप्य, २ कांस्य (५० बॅक स्ट्रोक, १०० बॅक स्ट्रोक, १०० फ्री स्टाईल), झिदान सय्यदने १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य (५० फ्री-स्टाईल, १०० फ्री-स्टाईल, २०० फ्रीस्टाईल, ४०० फ्रीस्टाईल, ८०० फ्रीस्टाईल), श्रुंगी बांदेकरने २ सुवर्ण, २ रौप्य (५० बॅकस्ट्रोक, १०० बॅकस्ट्रोक, २०० बॅकस्ट्रोक, २०० आयएम-४००, आयएम -२०० बॅक स्ट्रोक, १०० फ्रीस्टाईल, २०० फ्री स्टाईल) पटकावले.