फ्रान्सची पुनरावृत्ती रशियात

- ‘अल्ला हो अकबर’ म्हणत पोलिसावर हल्ला

Story: मॉस्को : |
31st October 2020, 12:15 am
फ्रान्सची पुनरावृत्ती रशियात

मॉस्को : रशियाच्या मुस्लिमबहुल भागात शुक्रवारी एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे रशियात खळबळ उडाली आहे. गुरुवारी फ्रान्समधील चर्चमध्ये तिघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता रशियातही घटना घडली आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणांना अधिक सतर्क झाले आहेत. दरम्यान, 

 स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्लेखोराचे नाव विटले अंतीपोव असे आहे. रशियन तपास यंत्रणांनी ही घटना दहशतवादी घटना असल्याचे समजून तपास सुरू केला आहे. हल्लेखोराचे वय १६ असून त्याने कुकमोर भागातील पोलिस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोराकडे धारदार चाकू होता. त्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी झाले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या.

इस्लामिक देशांनी केला फ्रान्स 

राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा निषेध 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्राच्या मुद्यावरून शिक्षकाची हत्या झाल्यानंतर राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर तुर्की, पाकिस्तानसह इतर इस्लामिक देशांनी फ्रान्सचा विरोध केला आहे. अशातच आता भारतातून फरार असलेला आणि मलेशियात असलेल्या इस्लाम प्रचारक झाकीर नाईकने गरळ ओकली आहे. मॅक्रॉन यांचे नाव न घेता नाईक याने अल्लाहच्या अनुयायांना वाईट वागणूक देणार्‍या आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍यांना भयानक शिक्षा मिळणार असल्याचे म्हटले आहे. 

भारतातही काही ठिकाणी मॅक्रॉन यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मध्यप्रदेशातील भोपाळमधील एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये अनेक मुस्लिम नागरिक मॅक्रॉन यांच्याविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत.  

हेही वाचा