Goan Varta News Ad

विलगीकरणात आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न : जुआन

|
26th October 2020, 07:36 Hrs
विलगीकरणात आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न : जुआन

पणजी :एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक जुआन फर्नांडो यांनी विलगीकरणाच्या कालावधीतही स्वत:चा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपत आला आहे. त्यांच्यासह अनेक परदेशी खेळाडू आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत.
हॉटेलच्या खोलीतून बोलताना जुआन यांनी सांगितले की, ते कशा प्रकारे इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) नव्या सत्रासाठी तयारी करत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी विलगीकरणाच्यापूर्वीही स्वत:ला प्रेरित करण्यासाठी अनेक प्रकारच्या कसरती केल्या आहेत.
मी कामे तयार करीत आहे. कोचिंग स्टाफचे व्यवस्थापन करीत आहे आणि या आठवड्यापासून कसे कार्य करणार आहोत हे स्पष्ट करीत आहे. मला म्हणायचे आहे की जावी आणि मला दोघांना मदत करण्याच्या प्रत्येकाच्या इच्छेचा मला खूप अभिमान आहे. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या कडक लीग प्रोटोकॉल प्रत्येकजण स्वीकारत असल्याने त्यांच्या खोल्यांच्या हद्दीत राहण्याचे आवाहनही जुआन यांनी केले.