
म्हापसा : गोव्यातील (Goa) अस्नोडा (Assonora) येथे प्रवासी बसने (Bus) दुचाकीला (Two Wheeler) धडक दिल्याने दुचाकीस्वार लक्ष्मीकांत शेटकर (४५ वर्षे, रा. खोर्जुवे, बार्देश) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची स्मृती शेटकर (३८) या गंभीर जखमी झाल्या.
दुचाकीस्वार लक्ष्मीकांत शेटकर हे आपल्या दुचाकीवरून पत्नी सोबत म्हापशाहून डिचोलीच्या दिशेने जात होते. तर बस विरुद्ध दिशेने येत होती. आज शुक्रवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास अस्नोडा येथील क्रीडा संकुला जवळील चॅपेल समोर हा अपघात घडला. त्यात लक्ष्मीकांत यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या स्मृती शेटकर यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिथून त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. कोलवाळ पोलिसांनी (Police) बस चालक संशयित तुकाराम सावंत (माशेल) याला ताब्यात घेतले असून, यासंदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत.