Goan Varta News Ad

लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जम्मूत अटक

जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे.

|
20th September 2020, 12:34 Hrs
लष्कर-ए-तोयबाच्या  तीन दहशतवाद्यांना  जम्मूत अटक

श्रीनगर : जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून रोख रकमेसह मोठ्या प्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एके-५६ रायफल, दोन पिस्तुलं, चार ग्रेनेड व एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे दक्षिण काश्मीर येथील असून ते १९ ते २५ वर्षे या वयोगटातील आहेत.