टोकियो :नोव्हेंबरमध्ये जपानमधील आरियाक टेनिस पार्क येथे डब्ल्यूटीए पॅन पॅसिफिक ओपन कोविड -१९ मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आयोजकांनी ही माहिती दिली. आयोजकांनी सांगितले की, ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकारी समितीने सर्वतोपरी प्रयत्न केले पण सध्याच्या परिस्थितीत हे आयोजन करणे शक्य नाही.
आयोजकांनी सांगितले की, समितीने रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय आणि आरोग्य व सुरक्षितता लक्षात ठेवून स्पर्धा भरवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले. प्रयत्नांनंतर कार्यकारी समितीला स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय पुढे ढकलता आला नाही आणि विशेषत: जपानमधील संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेऊन ही स्पर्धा रद्द करणे सार्वजनिक आरोग्याच्या हिताचे आहे, असा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ही करोनाच्या साथीमुळे नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. जपानमधील ही या रोगामुळे रद्द होणारी तिसरी टेनिस स्पर्धा आहे.