इस्लामाबाद : पाकिस्तानचा फलंदाज अहमद शहजादने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना केल्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शहजादने म्हटले आहे की, विराट कोहलीशी तुलना केल्यामुळे तो खूप दबावात आहे.
अहमद शहजाद म्हणाला, विराट कोहलीच्या तुलनेत नक्कीच एक दबाव आहे. आम्ही त्या खेळाडूंच्या पार्श्वभूमीकडे लक्ष न देता अनेकदा दोन खेळाडूंची तुलना करण्यास सुरवात करतो. कोणताही खेळाडू यशस्वी होण्यासाठी त्याला प्रशिक्षक, कर्णधार आणि क्रिकेट मंडळाने पाठिंबा दिला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जर त्याला चांगले प्रदर्शन करायचे असेल तर आत्मविश्वास देणे आवश्यक आहे. जोपर्यंत एखाद्या खेळाडूला पूर्ण आधार आणि जास्त वेळ मिळत नाही तोपर्यंत त्याचा आत्मविश्वास वाढत नाही. जर तसे झाले नाही तर ते त्यांची जागा वाचवण्यासाठी खेळायला लागतात.
अहमद शहजाद पुढे म्हणाला की, विराट कोहली, रोहित शर्मा, जो रूट, केन विल्यमसन आणि बाबर आझम यांची पार्श्वभूमी पाहिल्यास ते त्या दृष्टीने खूप भाग्यवान आहेत. कोहलीने हा खुलासा केला होता की, तो बर्याच वेळा संघातून वगळला जाणार आहे पण एमएस धोनीने त्याला पाठिंबा दर्शविला. हीच गोष्ट रोहित शर्माचीही होती, त्यालाही धोनीचा पूर्ण पाठिंबा मिळाला.
विराट कोहली आणि अहमद शहजाद एकाच वेळी जागतिक क्रिकेटमध्ये दिसले. पण हे जाणून आश्चर्य वाटेल की कसोटी क्रिकेटमध्ये अहमद शहजादने विराट कोहलीपेक्षा चांगली सुरुवात केली होती. १३ कसोटी सामन्यांनंतर शहजादने ४०.५१ च्या सरासरीने ९८२ धावा केल्या, तर विराट कोहलीने ३५.८१ च्या सरासरीने ७८८ धावा केल्या आहेत.