महेंद्रसिंग धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर : फाफ डु प्लेसी


16th May 2020, 04:05 pm
महेंद्रसिंग धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर : फाफ डु प्लेसी

केप टाऊन : महेंद्रसिंग धोनी हा सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसीने म्हटले आहे. याशिवाय तो म्हणाला की, महेंद्रसिंग धोनी हा असा खेळाडू आहे ज्याला संघ मिटिंगमध्ये जास्त विश्वास नाही. धोनीबरोबर खेळलेल्या अनुभवाच्या जोरावर डु प्लेसीने चेन्नई सुपरकिंग्जसाठी हे विधान केले आहे.

तमिम इक्बाल याच्याशी फेसबुकवर बोलताना डू प्लेसी म्हणाला, धोनी शांत आहे. मी त्यांच्यापेक्षा चांगला फिनिशर असलेल्या कोणाबरोबरही खेळलेलो नाही. त्याला मैदानावर खेळताना पाहणे विलक्षण असते. बॉल टाईमिंग कसा साधायचा याची त्याची पद्धत वेगळी आहे.

महेंद्रसिंग धोनी एक वेगळा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानेही महेंद्रसिंग धोनीचे वेगळे कर्णधार असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, मला वाटते की संघाच्या बैठकीत कर्णधाराने बोलावे पण धोनी तसे करत नाही. संघाच्या अधिक बैठकींवरही त्यांचा विश्वास नाही. तो एक नैसर्गिक कर्णधार आहे आणि त्याच्याकडे तेजस्वी मन आहे, ज्याचा उपयोग मैदानावर निर्णय घेण्यासाठी तो करतो.

चेन्नई सुपरकिंग्सबरोबर खेळण्याबद्दल बोलताना डु प्लेसी म्हणाला की, धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांच्यासारख्या विचारसरणीच्या व्यक्तींची निवड होणे माझे भाग्य आहे. मी नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून बरेच काही शिकलो आहे. धोनी आणि फ्लेमिंग हे दोघेही उत्तम कर्णधार राहिले आहेत. विशेष म्हणजे, ड्यू प्लेसीने काही वेळा चेन्नईकडून खेळताना धोनीबरोबर फलंदाजीही केली आहे.

धोनी सध्या रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनमध्ये आहे. सोशल मीडियावर त्याची काही छायाचित्रे वायरल झाली आहेत. धोनी त्याची मुलगी आणि पत्नीबरोबर बराच वेळ घालवत आहे.