दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात कॅथ लॅबसाठी ५.६१ कोटींचा निधी मंजूर

कॅथ लॅबची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील हृदयविकाराच्या रुग्णांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारखे महत्त्वाचे उपचार मडगावमध्येच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात जावे लागणाऱ्या रुग्णांचा प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात कॅथ लॅबसाठी ५.६१ कोटींचा निधी मंजूर

मडगाव : मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात (हॉस्पिसियो) अत्याधुनिक कॅथ लॅब उभारण्यासाठी राज्य सरकारने ५ कोटी ६१ लाख ९५ हजार ८६९ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला.
या निधीतून मेसर्स फिलिप्स इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कॅथ लॅबसाठी अत्याधुनिक उपकरणे आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. पाच टक्के जीएसटीसह या खरेदीसाठी आरोग्य सेवा संचालकांना खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वित्त विभागाची सहमती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे सहसचिव डॉ. प्रणब जी. भट यांनी हा आदेश जारी केला आहे.
कॅथ लॅबची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील हृदयविकाराच्या रुग्णांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारखे महत्त्वाचे उपचार मडगावमध्येच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात जावे लागणाऱ्या रुग्णांचा प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा