पणजी : गोवा विधानसभेत एसटी आरक्षणाच्या (ST reservation in Goa assembly) कार्यवाहीसाठी एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दर्शविला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत गोवा सरकार व मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनाला पक्षकार करून ७ दिवसात त्यांची बाजू उच्च न्यायालयाने ऐकून घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेशाची मुदत २४ डिसेंबरपर्यंतच असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर अंतिम आदेश दिलेला नाही. अंतरिम आदेश असल्याने त्याला स्थगिती देता येणार नाही.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात गोवा सरकार व मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनतर्फे स्वतंत्र याचिका (एसएलपी) दाखल करण्यात आली आहे.


