धारबांदोडा : अल्पवयीन चालवत होता दुचाकी; अपघातात दोन युवतींचा दुर्दैवी मृत्यू

वडापाव खाण्यासाठी जात असताना घडला होता अपघात ; उधळशे-साकोर्डा येथे दुचाकीची धडक विजेच्या खांब्याला बसून झालेल्या भीषण अपघातातील दुसऱ्या युवतीचाही रात्री उशिरा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे अपघातातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. मृत्यू पावलेल्या युवतीचे नाव रावी गावकर असे आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
धारबांदोडा : अल्पवयीन चालवत होता दुचाकी; अपघातात दोन युवतींचा दुर्दैवी मृत्यू

फोंडा : उधळशे-साकोर्डा येथे दुचाकीची धडक विजेच्या खांब्याला बसून  झालेल्या भीषण अपघातातील दुसऱ्या युवतीचाही रात्री उशिरा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे अपघातातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. मृत्यू पावलेल्या युवतीचे नाव रावी गावकर असे आहे.

काल रात्री दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची खांब्याला जोरदार धडक बसून हा अपघात घडला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निधी पाटील या युवतीचा काल रात्रीच मृत्यू झाला होता. तर रावी गावकर या युवतीलाही गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना रात्री उशिरा तिचीही प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन तरुणींच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा