वाळपई : सत्तरी तालुक्यातील भुईपाल येथील एसीजीएल (बीबीडी) जंक्शनवर झालेल्या भीषण अपघातात वाळपईतील देवानंद सुरेंद्र सावरकर ( ‘जॉली टेलर’) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वाळपई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद सावरकर हे भुईपाल येथील जंक्शनवर बसची प्रतीक्षा करत उभे होते. त्या वेळी एका बसच्या चेसीसची त्यांना धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भररस्त्यावर बसची वाट पाहत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे वाळपईतील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. वाळपई पोलीस (Valpoi Police) अधिक तपास करीत आहेत.


