अनमोड घाटात ट्रकचा ‘ब्रेक’ निकामी; मंदिरासमोर कोसळला : चालक जखमी

धारवाड येथून गोव्यातील आमोणा येथे मॅगनीज (स्पंज) वाहतूक करणारा रामनगर येथील १४ चाकी ट्रक अनमोड घाटात ‘ब्रेक’ निकामी झाल्याने रस्त्यावरून थेट खाली कोसळला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास गोवा हद्दीतील दूधसागर मंदिराच्या वरील रस्त्यावर हा अपघात घडला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
अनमोड घाटात ट्रकचा ‘ब्रेक’ निकामी; मंदिरासमोर कोसळला : चालक जखमी

रामनगर : धारवाड येथून गोव्यातील आमोणा येथे मॅगनीज (स्पंज) वाहतूक करणारा रामनगर येथील १४ चाकी ट्रक अनमोड घाटात ‘ब्रेक’ निकामी झाल्याने रस्त्यावरून थेट खाली कोसळला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास गोवा हद्दीतील दूधसागर मंदिराच्या वरील रस्त्यावर हा अपघात घडला. ट्रक थेट खालच्या रस्त्यावर दूधसागर मंदिरासमोर कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात ट्रकचालक इजाज अहमद (वय ४०, रा. लोंडा) जखमी झाला. गोवा हद्दीतील १०८ रुग्णवाहिकेने घटनास्थळी दाखल होत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ट्रकमध्ये ट्रकमालकही उपस्थित होता. त्याला किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, पहाटे सहाच्या सुमारास फोंडा येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे ट्रकच्या धडकेत झाड रस्त्यावर कोसळले होते. अग्निशमन दलाने ते हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. या घटनेची नोंद कुळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा