‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो’मध्ये ‘वन लास्ट स्टॉप’ विजयी

बुधवारी इफ्फीमध्ये ‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो’च्या सहाव्या आवृत्तीचा समारोप झाला. या उपक्रमांतर्गत, चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रांतील १०० तरुण प्रतिभावंतांनी ४८ तासांच्या आव्हानात्मक स्पर्धेत आपल्या कौशल्याची कसोटी लावली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
22 mins ago
‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो’मध्ये ‘वन लास्ट स्टॉप’ विजयी

पणजी : बुधवारी इफ्फीमध्ये (57th International Film Festival of India (IFFI) in Goa)  ‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो’च्या सहाव्या आवृत्तीचा समारोप झाला. या उपक्रमांतर्गत, चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रांतील १०० तरुण प्रतिभावंतांनी ४८ तासांच्या आव्हानात्मक स्पर्धेत आपल्या कौशल्याची कसोटी लावली.

उपक्रमाचा समारोप पाच संघांनी तयार केलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाने आणि विविध १५ श्रेणींमधील पुरस्कारांच्या वितरणाने झाला. यावेळी मोहक गांधी दिग्दर्शित ‘वन लास्ट स्टॉप’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. समारोप सोहळ्याला महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

चित्रपट विभागात तमन्ना ठाकूर दिग्दर्शित ‘अ लिटल समथिंगला’ व ३ लाख रूपयांचे पारितोषिक मिळाले.  तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तमन्ना ठाकूर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्र म्हणून सिद्धी पारकर, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून त्रिशा मन्ना, संपादक म्हणून नयन चौटालिया आणि मानव अग्रवाल, पटकथा लेखक म्हणून जिथिन एस., ध्वनी रचनेसाठी (साउंड डिझाइन) अश्विन अशोक, पार्श्वगायनासाठी पार्वती एस., संगीतकार म्हणून अक्षय कटोरे, वेशभूषा रचनेसाठी सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल,

‘हेअर अँड मेकअप आर्टिस्ट’ म्हणून कशिश जैस्वाल, कला दिग्दर्शनासाठी सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल, ॲनिमेशन आणि व्हीएफएक्साठी हर्ष सहानी आणि प्रकाश कुमार मेहता तर व्हॉइस-ओव्हरसाठी सुदेक्षा सरकार यांना पारितोषिक देण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा