युवक, महिला स्वयंपूर्ण झाल्यासच विकसित गोव्याचे उद्दिष्ट साध्य होणार : मुख्यमंत्री

लोकभवनात स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्यात प्रतिपादन; राज्यातील युवक तसेच महिला स्वयंपूर्ण झाल्या तरच स्वयंपूर्ण गोवा तसेच विकसित गोव्याचे उद्दीष्ट साध्य होणे शक्य आहे. नोकरी तथा व्यवसायासाठी महिला व युवकांना कुशलेतचे प्रशिक्षण देण्यात सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी म्हटले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
युवक, महिला स्वयंपूर्ण झाल्यासच विकसित गोव्याचे उद्दिष्ट साध्य होणार : मुख्यमंत्री

पणजी : राज्यातील युवक तसेच महिला स्वयंपूर्ण झाल्या तरच स्वयंपूर्ण गोवा तसेच विकसित गोव्याचे उद्दीष्ट साध्य होणे शक्य आहे. नोकरी तथा व्यवसायासाठी महिला व युवकांना कुशलेतचे प्रशिक्षण देण्यात सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी म्हटले आहे.

दोनापावल येथील लोकभवनवर स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 'स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्या'चे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. हा उपक्रम गोव्यातील महिला आणि तरुणांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, आर्थिक मदत आणि उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.

१६ सरकारी विभागांच्या ६० योजनांच्या माध्यमातून महिलांना कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, पर्यटन, आरोग्यसेवा, किरकोळ व्यापार (रिटेल) आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध होऊ शकतात. या मेळाव्यात २४ संस्थांच्या माध्यमातून उद्योगाभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम, शिकाऊ उमेदवारीच्या (अप्रेंटिसशिप) संधी, आर्थिक साहाय्य आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.

मी महिलांना, विशेषतः १८ ते ५० वयोगटातील महिलांना, या उपक्रमात सहभागी होण्याचे, उपलब्ध संधी जाणून घेण्याचे आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पावले उचलण्याचे आवाहन करतो. जेव्हा एखादी स्त्री स्वावलंबी बनते, तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला सक्षम करते. 'नारी शक्ती', 'युवा शक्ती' आणि सामूहिक प्रयत्नांतून आपण 'स्वयंपूर्ण गोवा' आणि 'विकसित गोवा २०३७'च्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा