‘नजर हटी, दुर्घटना घटी’; पर्वरी उड्डाणपूल परिसरात आता वाहतूक पोलिसांकडून उद्घोषणेद्वारे जागृती

‘मोबाईलवर बोलू नका, वाहतूक नियम पाळा’चा संदेश; पर्वरीसहीत गोव्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता वाहन चालकांच्या जागृतीवर भर दिला आहे. पर्वरी उड्डाणपूल परिसरात उद्घोषणेद्वारे जागृती करण्यात येत आहे. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’, ‘वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका’, ‘वाहतूक नियम पाळा, आपला व इतरांचा जीव वाचवा’ असे संदेश उद्घोषणेच्या माध्यमातून देत वाहन चालकांना सतर्क करण्यात येत आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
‘नजर हटी, दुर्घटना घटी’; पर्वरी उड्डाणपूल परिसरात आता वाहतूक पोलिसांकडून उद्घोषणेद्वारे जागृती

पर्वरी : पर्वरीसहीत गोव्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता वाहन चालकांच्या जागृतीवर भर दिला आहे. पर्वरी उड्डाणपूल परिसरात उद्घोषणेद्वारे जागृती करण्यात येत आहे. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’, ‘वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका’, ‘वाहतूक नियम पाळा, आपला व इतरांचा जीव वाचवा’ असे संदेश उद्घोषणेच्या माध्यमातून देत वाहन चालकांना सतर्क करण्यात येत आहे.

गोव्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात जाणारे बळी आणि जखमी होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. नुकताच सुरू करण्यात आलेल्या पर्वरी उड्डापुलावर भीषण अपघातात दोघांचे बळी गेल्यानंतर व दोघे जखमी झाल्यानंतर अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. तरीही या रस्त्यावरील अपघातांचे सत्र थांबत नाही. दोन दिवसांमागे मध्यरात्री या रस्त्यावर आणखी एक अपघात झाला.

उड्डाणपूल सुरू केल्यानंतर अवघ्या १० दिवसांत या रस्त्यावर अत‌िवेगाने वाहन चालवून नियमांचे उल्लंघन केल्याची ५८० प्रकरणे नोंद झाली आहेत.  वाहन चालकांनी नियम पाळावेत व अपघात टाळावेत यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या पर्वरी उड्डाणपुलावर वाहतुकीचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.

उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे बसवण्यात आले. वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले. तरीही वाहन चालक दाद देत नसल्याने, आता पोलिसांनी जागृतीवर भर दिला आहे. आणि उद्घोषणेद्वारे वाहन चालकांमध्ये नियम पाळण्यासंदर्भात जागृती घडवून आणून अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रयत्नरत आहेत. त्यासाठी खास वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. 

आता प्रत्येक घराबाहेर ‘स्पीड ब्रेकर’ टाकायचे बाकी : मंत्री दिगंबर कामत

दरम्यान, पर्वरी उड्डाणपुलावरील भीषण अपघातात दोघांचे बळी गेल्यावर व दोघे जखमी झाल्यावर उपाययोजना हाती घेऊनही दोन ‌दिवसांमागे आणखी एक अपघात घडला. यासंदर्भात पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांना विचारले असता; अपघात नेमका कसा घडला हे शोधून काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. अतिवेगामुळेच हा अपघात घडला.

याठिकाणी ‘स्पीड ब्रेकर’ घालण्यासंदर्भात पत्रकारांनी सुचवले असता; आता केवळ प्रत्येक घराबाहेर ‘स्पीड ब्रेकर’ टाकायचे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचे मंत्री कामत म्हणाले.

१० दिवसांत अतिवेगाची ५८० प्रकरणे नोंद

पर्वरीतील उड्डाणपूल सुरू केल्यानंतर १० दिवसांत वेगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची ५८० प्रकरणे नोंद झाली आहेत. नियम धाबाव्यावर बसवण्याची ही आकडेवारी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी नियम पाळून वाहने चालवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. आणि त्यासाठी पोलिसांनी आता जागृतीवर भर दिला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा