कदंब बस प्रवाशांना स्मार्ट कार्डवर मिळणार २० टक्के सवलत

सलग एक वर्ष वापरल्यास ३० टक्के लाभ : १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd October, 09:53 pm

पेडणे तालुक्यात जलस्रोत खात्याच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली अनेक विकासकामे गेली दोन ते तीन वर्षे प्रलंबित असल्याबद्दल जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित का ठेवली जातात, असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी केवळ फायली हाताळत बसू नये, तर प्रत्यक्ष कामे मार्गी लावावीत. त्यासाठी गरज पडल्यास जादा वेळ काम करावे; मात्र नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

पेडणे येथील जलस्रोत खात्याच्या कार्यालयात आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अभियंते, सहाय्यक अभियंते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पेडणे तालुक्यात दोन ते तीन वर्षांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर भर द्यावा. आवश्यक असल्यास जादा वेळ काम करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले.
नागरिक, लोकप्रतिनिधींनी मांडल्या समस्या

या कार्यक्रमात पेडणे तालुक्यातील विविध पंचायतींच्या सरपंचांनी नाल्यांची साफसफाई, पावसाळी पाण्याचा निचरा, रस्त्यालगतच्या संरक्षण भिंती आणि ड्रेनेज व्यवस्था यांसंबंधीच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या.

शापोरा नदी आणि अन्य जलप्रवाहांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा