‘गोवा विक्रीसाठी नाही! ’ समाजमाध्यमावरून राहुल गांधींची भाजपवर टीका

गोव्यातील भाजपच्या १५ वर्षांच्या कारभारात जमिनी, रोजगार आणि मतांची चोरी झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरून भाजपवर कडक टीका केली. आज ते 'गोवा राखण यात्रेत' सहभाग घेतील.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
34 mins ago
‘गोवा विक्रीसाठी नाही! ’ समाजमाध्यमावरून राहुल गांधींची भाजपवर टीका

मडगाव: गोव्यातील भाजपच्या १५ वर्षांच्या कारभारात कुशासन आणि जनतेची लूट झाली असून, या काळात जमिनी, पैसा, तरुणांचा रोजगार, आमदार आणि जनतेच्या मतांची चोरी करण्यात आल्याचाआरोप काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. गोव्याची अस्मिता, जमीन आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या ‘गोय राखण यात्रे’त राहुल गांधी आज, रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सहभागी होणार आहेत.



राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरून भाजपवर निशाणा साधताना, गोव्यातील भाजपचा १५ वर्षांचा कार्यकाळ म्हणजे कुशासन आणि लुटीचा काळ असल्याची टीका केली. या काळात जमिनींची चोरी, पैशांची चोरी, तरुणांच्या रोजगाराची चोरी आणि आमदारांची चोरी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर जनतेच्या मतांचीही चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

गोव्याची अस्मिता धोक्यात असल्याचे नमूद करत राहुल गांधी यांनी जनतेला एकजुटीने भाजपविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले. गोवा विक्रीसाठी नाही; गोवा हा गोमंतकीय जनतेचा आहे, असा ठाम संदेश देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोव्याची ओळख, सन्मान आणि उज्ज्वल भविष्याचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.


May be an image of text


गोव्याची जमीन, रोजगार, अस्मिता आणि जनतेचे हक्क यांच्या रक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून काँग्रेसकडून राज्यभरात ही यात्रा काढण्यात येत आहे. आज मडगाव येथे यात्रेचा समारोप होणार असून, राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कालकोंडा येथे यात्रेत होणार सहभागी, गोय राखण यात्रेत रविवारी दुपारी ३.३० वाजता कालकोंडा येथे सहभागी होऊन जनतेसोबत पायी चालणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. या यात्रेत राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा