मंत्री गु‌दिन्होकडून आमदार जीतचे समर्थन; दयानंद सोपटे आक्रमक : पक्षाकडे कारवाईची मागणी

मंत्री आणि आमदारांना पक्षाच्या भूमिकेविरोधात वक्तव्ये न करण्याचे निर्देश देण्याची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
57 mins ago
मंत्री गु‌दिन्होकडून आमदार जीतचे समर्थन; दयानंद सोपटे आक्रमक : पक्षाकडे कारवाईची मागणी

कोरगाव : वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो (Transport Minister Mauvin  Godinho) यांनी मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर (Jit Arolkar)  यांच्या समर्थनार्थ केलेल्या विधानांवर भाजपचे नेते तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आक्षेप घेतला आहे. मंत्री गुदिन्हो यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्या भूमिकेशी विसंगत ठरतील अशी वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी भूमिका सोपटे यांनी मांडली आहे.

मंत्री गुदिन्हो यांनी मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सोपटे यांनी सांगितले. पक्षाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप नेतृत्व काय भूमिका घेते, मंत्री गुदिन्हो यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा