..तर भाजपविरोधात महायुतीस काँग्रेस तयार : वेणुगोपाल

काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ प्रियोळ मतदारसंघात; राज्यातील विरोधी पक्षांचा भाजपला हरविण्याचा प्रामाणिक हेतू असेल तर सर्व विरोधी पक्ष काँग्रेसबरोबर आघाडीत सहभागी होतील, असे अ. भा. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ बुधवारी प्रियोळ मतदारसंघात पोचली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
..तर भाजपविरोधात महायुतीस काँग्रेस तयार : वेणुगोपाल

पणजी : राज्यातील विरोधी पक्षांचा भाजपला हरविण्याचा प्रामाणिक हेतू असेल तर सर्व विरोधी पक्ष काँग्रेसबरोबर आघाडीत सहभागी होतील, असे अ. भा. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’  बुधवारी प्रियोळ मतदारसंघात पोचली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणूक जवळ पोचल्याने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून सेवा संकल्प अभियान सुरू असतानाच विरोधी काँग्रेस पक्षाने ‘गोवा राखण यात्रे’ला प्रारंभ केला आहे. येते २७ दिवस ही यात्रा चालेल.

पणजी व ताळगाव मतदारसंघांत काल मंगळवारी ही यात्रा झाली. आज प्रियोळ मतदारसंघात सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बावटा दाखवून यात्रेचे उद्घाटन केले. यानिमित्त विरोधकांच्या आघाडीबाबत विचारले असता त्यानी भाजपला हरविण्याचा हेतू प्रामाणिक असल्यास सर्व विरोधक एकत्र येतील असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस व इतरांची उपस्थिती होती.
भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचारात वाढ झालेली आहे. कायदा, सुव्यवस्था साफ बिघडलेली आहे. अंमली पदार्थांचा व्यवहार बेसुमार वाढलेला आहे. गोमंतकीय जनता भाजप सरकारला कंटाळलेली आहे. यामुळे पणजी व ताळगावात गोवा राखण यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जसजशी यात्रा पुढे सरकेल तसतसा जनतेचा प्रतिसादही वाढत जाईल, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.  

हेही वाचा
सर्व पहा